top of page

आई आहे म्हणूनच...

  • Writer: leena dhawan
    leena dhawan
  • Nov 26, 2020
  • 2 min read

PC- Google


काही वर्षांपूर्वीची गोष्ट, सोसायटीतल्या बायकांनी किटी पार्टीचा ग्रुप करायचं ठरवलं. मी दुसर्या वेळेस प्रेगन्ट होते आणि sabbatical घेतलं होतं. सहज ओळख व्हावी म्हणून त्या मीटिंग ला गेले. गप्पाटप्पा सुरू झाल्या आणि त्यातली एक सहज शेरा मारून गेली; “ अभीदो बच्चे होने के बाद कहा जाॅब करेंगे आप, टाईम ही नही मिलता कुछ करने के लिये।” जमलेल्या सगळ्यांनी त्यावर माना डोलावल्याआणि कसा वेळच मिळत नाही ह्यावर पुढचा एक तास छान गप्पा रंगल्या.

त्यावेळेस अभिनेते अनुपम खेर यांच्या एका मुलाखतीतला एक प्रसंग आठवला. त्यांच्या struggling च्या काळाबद्दल बोलताना तेम्हणाले की, “ auditions सुरू असताना studios मध्ये struggling actors चा असा एक ग्रुप होता. मी कधीही त्यांच्या बरोबर बसायचोनाही. कारण त्यांच्यातील ती नकारात्मकता खूप घातक असते.”

तसंच काहीस मला ह्या ग्रुप मध्येही वाटलं आणि मी तिथून निघाले. त्यानंतर मी काही वर्षे MNC मध्ये मार्केटिंग खूप efficiently सांभाळलं.


लग्न झाल्यावर किंवा आई झाल्यावर अनेकदा असा समज होतो किंवा करून दिला जातो, की आता ती स्त्री स्वत:साठी काही करूशकणार नाही. माझं मात्र मत थोडं वेगळं आहे. निसर्गत:च स्त्री ही पुरुषांपेक्षा मानसिकदृष्ट्या जास्त सबळ असते आणि मातृत्व स्त्रियांनाजास्त खंबीर बनवत. Multitasking ची कुवत स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येते. मग ही मानसिकता आणि त्यातून निर्माणहोणारा भेदभाव का?


एकदा माझ्या male colleague ने मला विचारलं होतं की, “ how do manage to leave on time every day and still complete your work? “ आणि मी त्याला म्हटलं, “ because I am a mother.” मुलांसाठी म्हणून घरी वेळेवर पोहोचण्याच्या इच्छेने मी स्वत:लाआणि माझ्या टीमला तेवढं efficient आणि शिस्तबद्ध केलं होतं. पुरुषांच्या efficiency बद्दल मी शंका घेत नाही, पण त्यांनी उशीराआलेले समाजाला चालते आणि घरातल्या मंडळींना सुद्धा. मग आपसूकच सिगारेट ब्रेक, tea breaks वाढत जातात आणि बरोबरीनेworking hours सुद्धा.


म्हणूनच प्रत्येक स्त्रीने स्वत:च असं काही तरी केलं पाहिजे असं मला प्रकर्षाने वाटतं. ते काही तरी म्हणजे जाॅब किंवा करिअरच असंनाही, पण एखादा छंद, एखादी कला सुद्धा असूच शकतं की. ह्या गोष्टीतून पैसा कमावता येत असेल तर उत्तमच आहे; पण स्वत:चा असाएक कोपरा, व्यक्त होण्याची जागा आणि मुख्य म्हणजे स्वत:ची अशी ओळख निर्माण करण्यासाठी या गोष्टींची गरज आहे.


एक आई न सांगता खूप काही करत असते, पण सांगता येण्यासारखं काहीतरी स्वत: साठी तिनं करावं हीच अपेक्षा. आणि आई आहेम्हणूनच ती हे करू शकते ...

 
 
 

Comments


bottom of page