कल हो ना हो
- leena dhawan
- Dec 11, 2020
- 2 min read
PC Google
अगदी अलीकडचीच गोष्ट. बर्याच दिवसांनी माझ्या मैत्रिणीला - शीतलला फोन केला.कशी आहेस विचारल्यावर तिला रडूच कोसळलं.
तिचे वडिल दोन वर्षांपूर्वीच रिटायर्ड झाले होते. मस्त पार्टीसुद्धा झाली. घरच्या सारखे संबंध असल्यामुळे मीसुद्धा गेले होते. त्यातल्याआभार प्रदर्शनाच्या भाषणात त्यांनी त्यांचे plan मोठ्या हौशीने सांगितले. आणि नंतर काही महिन्यातच काही छोट्या छोट्या कुरबुरी सुरूझाल्या आणि हळूहळू त्याचे रुपांतर एका गंभीर आजारात झाले आणि ते अंथरुणालाच खिळले. परवा शीतलशी बोलताना ही गोष्टकळली तेव्हा काही वेळ माझा विश्वासच बसेना. त्यांचा तो Europe trip चा plan, photography शिकण्याचं स्वप्न सगळं सगळं एकाधक्क्याने कोलमडून पडलं होतं. रिटायर्ड झाल्यावर मिळालेली आयुष्यभराची पुंजी अशी पाण्यासारखी खर्च होताना बघून ते मनाने सुद्धाखचले होते. असं म्हणतात सत्य हे कल्पनेपेक्षा जास्त भयंकर असतं. तसाच काहीसा प्रत्यय मला येत होता.
शीतलच्या बाबांचं हे उदाहरण माझ्या ब्रेक घेण्याच्या निर्णयाला अजूनच मजबूत करून गेलं. उद्याची तजवीज करताना मुलांबरोबरचआणि स्वत: बरोबरचा “आज” घालवून कसं चालेल? उद्या आलाच नाही तर? भविष्यात काहीतरी मोठं मिळवण्याचा किंवा available करून देण्याच्या महत्वाकांक्षेपायी आजचे छोटे छोटे आनंदाचे क्षण घालवून आपण चूक करतोय का असं राहून राहून वाटू लागलं.
स्वत:शी होणारा हा वाद खूप कठीण असतो. Especially जेव्हा आपल्याला दोन बरोबर गोष्टींपैकी जास्त योग्य गोष्ट निवडायची असतेआणि जिंकणारे तसेच हरणारे सुद्धा आपणच असतो.
शीतलशी बोलून मी फोन कधीचाच ठेवला होता, पण विचार काही थांबण्याचे नाव घेईनात. आयुष्यात हे असे अनुभव आपल्यालाझोपेतून कोणी चेहर्यावर पाण्याचा हबका मारून जागं करावं ना तसं जागं करतात; आणि जाणीव करून देतात की आयुष्य कितीक्षणभंगुर आहे. आपल्या सर्वांच्याच बाबतीत एक गोष्ट अगदी शंभर टक्के खरी आहे; ती म्हणजे जोपर्यंत आपल्या आयुष्यात किंवाआपल्या कोण्या जवळच्या व्यक्तीच्या आयुष्यात असं काही घडत नाही तोपर्यंत आपणच सर्व काही control आणि plan करत आहोतअसा आभास होत असतो.
चला दुसर्यांच्या अनुभवातून धडा घेऊया... “आज” आकंठ जगूया... “आज” हसूया .... आजचा दिवस आपला “कल हो ना हो”
Comments