खरे growth milestones
- leena dhawan
- Mar 2, 2021
- 2 min read
काही दिवसांपूर्वीच एक forward वाचला आणि कायमचा लक्षात राहील इतका महत्वाचा वाटला. एका preliminary school च्याशिक्षिकेने पालकांना लिहिलेलं ते जाहीर पत्र होतं. त्यात तिने लिहिलं होतं की, “जेव्हा मी शाळेत असंख्य मुलं एकत्र बघते तेव्हा मला हेसांगण कठीण जातं; rather अशक्य असतं की ह्यातलं कुठचं मूल आधी चालू लागलं... कुठचं आधी बोलू लागलं... कोण अठराव्यामहिन्यात potty train झालंय कोण चौथ्या वर्षी. पण काही गोष्टी मी अगदी नक्की ओळखू शकते ... जसं कोण घरी कामात मदतकरतं... कोणाच्या घरी चढ्या आवाजात बोललं जातं...
कोण इतरांना सामावून घेतं आणि कोण स्वत:चच घोडं पुढे दामटतं.
मला तुमच्या मुलाचे so called “ growth milestones “ नाही दिसत. मला तुम्ही त्याच्या समोर कसे वागता ते नक्की दिसतं.
किती सहज पणे हे पत्र पालकत्वाच्या जबाबदारीची जाणीव करून देतं आणि त्याच बरोबर bigger picture ज्याला म्हणतात तेहीदाखवून देतं. कधी कधी हे “basic growth milestones” आत्मसात करण्याच्या नादात आपण हे big picture विसरूनच जातो.
त्यात अनेकदा, “ अरे अजून पालथा नाही होतं... वर्षाचा झाला चालत नाही... अमुक वयाचा आहे तमुक करत नाही ते इतक्या वर्षाचाझाला अजून लग्न झालं नाही किंवा मूल नाही” अगदी इतपर्यंत “लोकांची” विचारपूस आणि मुख्य म्हणजे तसं करताना स्वत:च्याकोणाशीतरी तुलना चालू असते.
माझं स्वत:चंही काहीसं असंच झालं होतं. माझ्या मोठ्या मुलाचा स्वभाव आधीपासूनच खूप conscious त्यामुळे तो प्रत्येक गोष्टकरताना बाचकत करायचा, बाहेरच्या लोकांशी बोलणं शक्यतो टाळायचा... कोणी जवळ आलं तर “bye bye” हाच त्याचा response.
साहजिकच समारंभाच्या वेळी मला awkward व्हायचं. त्यात त्याच्या वयाची ... दोन -अडीच वर्षांची मुलं हसत खेळत इकडे तिकडेधावताना पाहिली की मी खट्टू व्हायचे. नवरा मात्र म्हणायचा, “ त्याच्या social acceptance पेक्षा त्याला comfortable व्हायला वेळदेणं जास्त महत्वाचे आहे”. थोडा वेळ पटायचं पण कुठेतरी त्याने लवकर “ सुधारावं” वाटायचं.
एकदा असेच फिरायला एका resort ला गेलो होतो आणि मुलं जवळच खेळत होती. तेवढ्यात एका अशाच फिरायला आलेल्याकुटुंबातील बाईने माझ्या धाकट्या मुलाला “ such a cute baby!” म्हणत हात लावला आणि त्याबरोबर मोठ्या ने “bye bye “ करततिला ढकललं. मी बाजूलाच होते तेव्हा त्या बाईंना म्हटलं; “ sorry तो जरा shy आहे”
ती म्हणाली “ you are wrong... he is smart. परक्याकडून धोका होऊ शकतो एवढं समजण्याची त्याला अक्कल आहे. Very good kiddo “
माझं मलाच वाईट वाटलं की मी का त्याच्या ह्या दृष्टीने पाहू शकले नाही.
परवा dentist कडे,.... त्याचं दुसरं root canal चालू होतं, तेव्हा मला ह्या घटनेचं स्मरण झालं. पहिल्या वेळी बिथरून गेलेलं माझं पिल्लूकिती शांतपणे सगळं करून घेत होतं आणि त्याहूनही पुढे जाऊन “ don’t worry muma. I am fine “ म्हणून मला धीर देत होतं.
खरंच ... काही फरक पडत नाही कोण कितव्या वर्षी चाललं आणि कधी बोललं...फरक पडतो ह्या गोष्टीने की पालक म्हणून आपलाresponse कसा होता.
Comments