top of page

नाकावरच्या रागाला औषध काय??

  • Writer: leena dhawan
    leena dhawan
  • Dec 5, 2020
  • 2 min read

Updated: Dec 6, 2020


माझ्या ‘मोबाईल व्यसनमुक्ती’ वरील लेखावर अनेकांनी खूप सुंदर प्रतिक्रिया दिल्या. त्यात काहींनी आजकालच्या मुलांमध्ये दिसूनयेणार्या रागीटपणाबद्दल लिहिण्यास सांगितले. मी काही कोणी expert नाही, त्यामुळे जोपर्यंत मी माझ्या मुलांत एखादा बदल घडवूनआणत नाही; मला त्यावर लिहिण्यास conviction येत नाही. पण वाचकांच्या प्रतिक्रियांमुळे मी माझ्या मुलांच्या रागावर ताबामिळविण्याचा चंग बांधला.

गेल्या तीन आठवड्यात जे तीन बदल मी अंमलात आणले तेच इथे थोडक्यात सांगायचा प्रयत्न करते.

  1. बदलाची सुरुवात स्वत:पासून:

माझा स्वत:चा स्वभाव थोडा impatient आणि short tempered आहे; आणि त्यात दोन लहान मुले म्हटल्यावर खूप चिडचिड व्हायची. कधी कधी मुलांना प्रसादही मिळायचा. नवर्याचा स्वभाव एकदम शांत... कधीच चिडचिडेपणा नाही.

पण एकदा मुलांनी हद्दच केली. मी हरतर्हेने समजावून पाहिलं, पण मला जणू ती immune झाली होती. शेवटी नवर्याने ठेवणीतलाआवाज काढला तशी मुलं चपापली. मी सुद्धा चमकले.

तेव्हा जाणवलं एक तर रोज आरडाओरडा करून मुलं फक्त आपल्या रागावण्याला immune होत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे ती चिडलीकी माझ्यासारखी react करायची. तेव्हापासून स्वत:ची चिडचिड महद्प्रयत्नांनी कमी करते. मनातून राग आला तरी शब्दांना tone down करते. आणि मुख्य म्हणजे instructions न देता options देते. And it worked !!


  1. टीका नाही फक्त self correction

‘निंदकाचे घर असावे शेजारी’ पण constructive criticism करण्याची कला आणि ते positively घ्यायची कुवत खूप कमी लोकांमध्येअसते. त्यामुळे लहान मुलांकडून अशा परिपक्वतेची अपेक्षा करणं चुकीचं ठरेल.

मी हल्लीच एक self help book वाचलं आणि त्यातली एक गोष्ट मला पक्की लक्षात राहिली, ती म्हणजे - criticism always leaves room for justification, it's human nature”

तेव्हा वाटलं, पालक म्हणून मुलाला त्याच्या चुका दाखवण्यामागचा माझा हेतू जरा चांगला असला तरी त्याचा परिणाम जर अपेक्षितआहे तसा होत नसेल तर मला बदललं पाहिजे. आणि मी माझी feedback देण्याची पद्धत बदलली.

मुलाबरोबर माझे खटके mostly अभ्यासावरून उडायचे.

Handwriting खराब आहे परत लिही म्हटलं तर तो हेच छान आहे म्हणायचा.

आता मी त्यालाच सांगते की तू तुझ्या best written word ला winner म्हणून declare कर. स्वत: judge बनल्यावर तो त्याच्याच चुकाकाढू लागला, खोडून परत लिहू लागला. समजून उमजून improve होण्याचा आनंद काही वेगळाच असतो नाही का?


  1. रागाचं मोजमाप - numbers don’t lie

Dieting मधली एक trick आहे ज्यामध्ये तुम्ही रोज जे काही खाता ते लिहून ठेवायचं. त्यामुळे आपोआपच तोंडावर ताबा येतो. हीचtrick आम्ही रागावर ताबा मिळवायला वापरली. मी दोघांचाही anger chart बनवला. त्यात दिवसभरात जितक्यावेळा जो रागवेल, मारेल त्याला तितके negative मार्कस् द्यायचे ठरलं आणि रोज winner सुद्धा घोषित करायचं ठरवलं. दोन-तीन दिवस ही trick अंमलात आणली आणि मोठ्या मुलाने खेळ मस्त उचलून धरला.

तो आता राग control करतो. काही चुकलं तर थोड्या वेळाने स्वत:हून sorry म्हणतो. पश्चातापापेक्षा मोठा बदल तो काय बरं!


ह्या सगळ्या अनुभवांमध्ये एक गोष्ट पक्की होती. ती म्हणजे मुलांबरोबरचं connection. ते असलं की काहीही झालं तरी गाडी रुळांवरआणता येते.

चला तर मग प्रयत्न करत राहूया आणि शिकत राहूया.

 
 
 

2 Comments


Vasanti Raut
Vasanti Raut
Dec 06, 2020

Inspiration for new Moms

Like

Nilam Raut
Nilam Raut
Dec 05, 2020

Wow.. Ragacha mojmap.. Good initiative. Really like it . Proud of you

Like
bottom of page