top of page

पेरालतेउगवते

  • Writer: leena dhawan
    leena dhawan
  • Jan 23, 2021
  • 2 min read

असं म्हणतात आयुष्यात प्रत्येक गोष्ट एका price tag बरोबरच येते. आणि जितकी मोठी महत्वाकांक्षा तितक्या मोठ्या किंमतीचा हाtag असतो. अगदी खरं आहे. फक्त problem एकच आहे की ह्यातही कधी कधी समाजाचा दुटप्पीपणा आडवा येतो. Especially जरही गोष्ट जर स्त्रीच्या आणि त्याहूनही जास्त एका आईच्या बाबतीत असेल तर. आणि जेव्हा जेव्हा मी अशा घटना बघते तेव्हा तेव्हा ह्यादुटप्पीपणा बद्दलचा माझा राग वाढत जातो. मी पुन्हा स्वत: शी निश्चय करते की “माझी मुलं असं वागणार नाहीत. Rather मी त्यांनाअसं वागू देणार नाही”

म्हणजे गंमत बघा ना, स्त्री मुलांना जन्म देते म्हणून त्यांना सांभाळायची, त्यांच्यासाठी स्वत:च्या priorities बदलण्याची जबाबदारीआईची. समाज त्याला आईचे इतिकर्तव्यच समजतो आणि तसं केलं नाही तर judgemental सुद्धा होतो. कधी जर आईच्या जागीबाबांना chip in करावं लागलं तर आईला खूप guilty वाटतंच पण इतरही जण ती कशी कमी पडतेय आणि पुरुषाला आणि मुलांनाकित्ती त्रास होतोय हे दाखवून देतात. त्या स्त्रीला स्वार्थीपणाचा tag लावतात.

मुलं सुद्धा वडिलांच नसणं सहज accept करतात पण आईवर चटकन् रागावतात.

आता तुम्ही म्हणाल हे नैसर्गिक आहे ; तर त्यावर मी म्हणेन हे सांस्कारिक आहे. म्हणजे असं बघा, माझे वडिल लहानपणीच वारले. घरची परिस्थिती उत्तम होती. आई, आजी सगळ्याच working women. त्यामुळे त्यांना एकदुसर्यांच्या limitations ची कल्पना होती. कधी आईला उशीर झाला तर आजी म्हणायची, “ काम असेल खूप म्हणून झाला उशीर. त्यात काय रागवायचं. इतर वेळी तर असतेचकी ती.” ह्यामुळे आईच्या कामावर जाण्याबद्दल आदराची भावना होती. पण हीच गोष्ट सांगण्याचा tone जर आईला दोष देण्याचाअसता तर निश्चितच आमच्या मनात अढी निर्माण झाली असती.


पालकत्वाची जबाबदारी नक्कीच खूप मोठी आहे आणि ती घेण्याचा जेव्हा निर्णय घेतला जातो तेव्हा priorities बदलणार हे मनाशीपक्कं केलेलंच असतं. पण ही जबाबदारी दोघांची असते त्यामुळे त्यासाठी करावे लागणारे बदल सुद्धा दोघांनीही accept केले पाहिजेत. बर्याचदा ह्यात आईला compromises करावे लागतात आणि सामाजिक मानसिकतेच्या चौकटीतही तेच suitable असल्यामुळे तिचाही त्याला होकार असतोच. पण जर काही कारणास्तव तसं झालं नाही तर पुरुषाने ती कसर भरून काढायला काय हरकत आहे? आणिते जर शक्य नसेल तर त्या स्त्रीची होणारी कुचंबणा समजून घ्यायची संवेदनशीलता आणि तिच्या contribution बद्दलचं appreciation तिच्या पर्यंत पोहोचवण्याचं भान पुरुषांनी ठेवावे एवढीच अपेक्षा आहे. जेणेकरून मुलांमधे दोन्ही पालकांबद्दल आदराची भावना राहील.


खरं सांगू ही आई म्हणजे महान ... त्यागाची मूर्ती ही सगळी लेबलं मला खोटी वाटतात. एखाद्याला महान बनवलं की त्याच्याकडूनsacrifices करवून घेणं सोप्पं असतं.

म्हणूनच प्रयत्न करते की मुलांना प्रत्येक व्यक्तिच्या individual choices चा मान ठेवायला शिकवू शकेन आणि एक संवेदनशीलव्यक्ति घडवू शकेन.

पेरणी चालू आहे पाहू काय उगवतं आता!

 
 
 

Commenti


bottom of page