top of page

लिंगभेदाला छेद - संगोपनातील एक महत्वाचे पाऊल

  • Writer: leena dhawan
    leena dhawan
  • Nov 28, 2020
  • 2 min read

Updated: Dec 1, 2020


PC Google


आजकाल standup comedians चं नुसतं पीक आलंय आणि त्यातले काही काही विषय हसवता हसवता अंतर्मुख करतात. एकाअशाच comedian चा performance बघत होते आणि विषय होता millennial couples... आणि मग त्याने ह्या नवविवाहितजोडप्यांची स्वयंपाक करताना, घर सांभाळताना, बाजारहाट करताना उडणारी तारांबळ सांगून सगळ्यांना मनसोक्त हसवले. आणि मगम्हणाला, पूर्वी फक्त मुलांना स्वयंपाक, बाजारहाट येत नसे, पण आता equality च्या concept मध्ये आपण मुलांचे संगोपन मुलींप्रमाणेन करता, मुलींना मुलाप्रमाणे वागायला शिकवलं. त्यामुळे आता दोघेही घरकामाच्या दृष्टीने useless झाले आहेत.


त्याच्या ह्या वाक्यामुळे मी माझ्या आईच्या वागण्या बद्दल विचार करू लागले. Secondary ला गेल्यावर आई नेहमी बाजारात यादीघेऊन पाठवायची, बॅंकेची कामं सांगायची, घरातल्या छोट्या- छोट्या कामात मदत करायला सांगायची, चहा बनवण्यासारखी लहानसहान कामं द्यायची, सणावारांबद्दल सांगायची. तिचा उद्देश एकच की मला व्यवहार, घरकाम ह्या गोष्टींची ओळख व्हावी; जेणेकरुनदुसर्यांच्या घरी माझी पंचाईत होऊ नये.


स्त्री-पुरुष ही दरी निर्माण करण्यात स्रियांचा मोठा हातभार आहे. कधी आई म्हणून, पत्नी म्हणून, सासू म्हणून आपणच घरकामाला, स्वयंपाक करण्याला दुय्यम दर्जा दिला; म्हणूनच पुरुषांची पंगत आधी, ताजं, गरम ते कर्त्या पुरुषाच्या ताटात वाढणारी आणि “मलाचालतं” म्हणून शिळी भाजी आधी संपवणार्या आईने कळत-नकळत स्वत: बरोबर मुलीला सुद्धा कधी मागे ओढलं तिचं तिलाच कळलंनाही. इथेच लिंगभेदाचा पाया रचला गेला.


मग सुरु झाली ती स्त्री-मुक्ती चळवळ... स्त्री शिकली आणि पूर्वी फक्त घर सांभाळणारी ती आता office आणि घर अशा दोन्हीआघाड्या सांभाळू लागली. आणि ते म्हणतात ना, ‘ super women.. super mom is always super tired’. आणि हाच stress मगतिला परत उंबर्याच्या आत खेचू लागला. मुलींना उंबरा ओलांडायला शिकवताना मुलांना उंबर्याच्या अलीकडचं शिकवायला कोणीतरीविसरलं होतं.


तसं पाहिलं तर ज्याला जेवता येतं त्याला ते करताही यायला हवं. घरातील basic कामं ही ज्याने त्याने समजून केली तर एकाचव्यक्तीवर त्याचा ताण येत नाही. पण तरीही माझ्या आईच्या “दुसरीकडे पंचाईत नको” ह्या हिशोबाने बघायचं झालं, तर आताच्याnuclear family च्या काळात जेव्हा दोघंही आपापल्या घरट्यातून निघून वेगळं विश्व निर्माण करू इच्छितात, तेव्हा कोणाचीही पंचाईतहोऊ नये म्हणून मुलींना आणि मुलांना घरकामात हातभार लावावयास शिकवण्यात काय हरकत आहे?


आईशी हे सगळं बोलले तशी ती हसली. पुढच्यावेळी मुलांना भेटायला येताना ‘भातुकली’ घेऊनच आली.. म्हणाली, “इथूनच सुरुवातकरू देत की त्यांना”

आता जेव्हा दोघे कामात हातभार लावतात ते बघून बरं वाटतं. कुठल्याही बदलाची सुरुवात स्वत:पासूनच करावी नाही का?


आणि आज gender equality च्या नावाखाली मुला-मुलींना करिअरच्या महत्वाकांक्षा देताना आपल्याकडून पुन्हा एकदा स्वयंपाककरण्याला, घर सांभाळण्याला दुय्यम दर्जा देण्याची चूक होत असेल तर ती सुधारण्याची हीच वेळ आहे. कारण शेवटी हा सगळा प्रपंचएका सुखी घरासाठी आणि पोटासाठीच आहे नाही का?

 
 
 

Bình luận


bottom of page