top of page

मुलांशी बोलताना- भाग 3

  • Writer: leena dhawan
    leena dhawan
  • Jan 1, 2021
  • 2 min read

मुलांनी आमचं बोलणं ऐकावं म्हणून अवलंबलेला मार्ग तिसरा- टीका नाही फक्त self correction


‘निंदकाचे घर असावे शेजारी’ पण constructive criticism करण्याची कला आणि ते positively घ्यायची कुवत खूप कमी लोकांमध्येअसते. त्यामुळे लहान मुलांकडून अशा परिपक्वतेची अपेक्षा करणं चुकीचं ठरेल.

मी हल्लीच एक self help book वाचलं आणि त्यातली एक गोष्ट मला पक्की लक्षात राहिली, ती म्हणजे - criticism always leaves room for justification, it's human nature”

तेव्हा वाटलं, पालक म्हणून मुलाला त्याच्या चुका दाखवण्यामागचा माझा हेतू जरा चांगला असला तरी त्याचा परिणाम जर अपेक्षितआहे तसा होत नसेल तर मला बदललं पाहिजे. आणि मी माझी feedback देण्याची पद्धत बदलली.

मुलाबरोबर माझे खटके mostly अभ्यासावरून उडायचे.

Handwriting खराब आहे परत लिही म्हटलं तर तो हेच छान आहे म्हणायचा.

आता मी त्यालाच सांगते की तू तुझ्या best written word ला winner म्हणून declare कर. स्वत: judge बनल्यावर तो त्याच्याच चुकाकाढू लागला, खोडून परत लिहू लागला. समजून उमजून improve होण्याचा आनंद काही वेगळाच असतो नाही का?


असंच अजून एक उदाहरण सांगते जेव्हा आम्ही pressure न टाकता मुलांची अंतर्गत प्रेरणा जागृत केल्यामुळे होणारा बदल अनुभवला.

मुलाची वक्तृत्व स्पर्धा होती. As usual माझीच परीक्षा असल्याप्रमाणे मी tensed होते. त्यात Semi finals मध्ये त्याचा performance यथातथाच झाला होता. आणि म्हणूनच सतत practice करण्यासाठी मी त्याच्या मागे लागले होते, पण तो काही मला दाद देत नव्हता. एक क्षण आला की I actually lost my temper.

थोड्या वेळाने शांत झाले आणि त्याला घट्ट मिठी मारून म्हटलं, “ I am sorry. मी तुला खूप pressurise करतेय. Actually I want you to deliver your best. तू खूप चांगलं करतोयस फक्त तू अजून चांगलं करावंसं म्हणून हे सगळे प्रयत्न. पण आता मी तुला नाहीसांगणार. तू स्वत: जेव्हा ready असशील तेव्हा आपण practice करु”

त्याने माझे डोळे पुसले आणि okay म्हणाला.

मला वाटलं की तो लगेच करायला राजी होईल पण नाही.

संध्याकाळ झाली ... तरीही तो माझ्याकडे आला नव्हता.

माझं आईचं मन काही धीर धरेना.

शेवटी सासुबाईंना म्हटलं, “ मम्मी मी तुम्हाला speech बोलून दाखवते”

तसा तो झटकन् पुढे आला आणि म्हणाला, “ मी करणार first”

ह्या वेळी त्याच्या delivery मध्ये खूपच सुधारणा होती.

त्या दिवसानंतर मी त्याला फक्त practice ची frequency सांगायचे आणि तो विनातक्रार तितक्या वेळा practice करायचा.

ह्या एका घटनेतून पालक म्हणून मी बदलले. आणि मला ह्या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे की मी त्याला स्वयंप्रेरणेचा पाठ शिकवूशकले.

तुम्हाला जर हे suggestions आवडले असतील तर नक्की like आणि comment करा.

 
 
 

Comments


bottom of page