top of page

मुलांशी बोलताना- भाग १

  • Writer: leena dhawan
    leena dhawan
  • Dec 26, 2020
  • 2 min read

’मार्केटिंग communications’ व्यवसायात असल्यामुळे शब्दांच्या ताकदीबद्दल मला विश्वास नेहमीच होता. पण माझ्या multinational company बरोबरच्या assignament मध्ये रोजच्या संभाषणातील शब्दांच्या वापराबद्दल मी अधिकच जागरूक झाले. असे असले तरीहीहा consciousness ॲाफिसपुरताच मर्यादित होता.

हल्ली जेव्हा मी पालकत्वाबद्दल वाचायला सुरुवात केली तेव्हा मुलांशी बोलताना मी काही गोष्टी कटाक्षाने बदलल्या. त्यामुळे “मुलंऐकत नाहीत” ही माझी तक्रार कमी झाली आणि मुलांकडून “you are the best mom ever” ही compliment मिळू लागली तेवेगळेच.

पहिली गोष्ट- पालक म्हणून मुलांना स्वत:च्या authority ची जाणीव करून देणे.

मी authoritative parenting style ला नेहमीच प्राधान्य देते. कारण त्यामधे धाक आहे पण भीती नाही, उघडपणे व्यक्त होण्याचंस्वातंत्र्य आहे पण गृहित धरू देण्याची मनमानी नाही, मित्रत्व आहे पण प्रेमामुळे आलेली हतबलता नाही.

त्याच संदर्भात मी John Rosemand ह्यांचा एक video पाहिला आणि त्यात त्यांनी सांगितलेला एक बदल मी करून पाहिला. तो असाकी, आपण बोलताना मुलांना “ let us go for bath now” किंवा “ let us finish our homework now” अशा प्रकारच्याinstructions देत असतो. त्याच्या सहकार्याची अपेक्षा करणारा असा हा tone आहे. पण ह्या ऐवजी “ I WANT YOU TO take bath” किंवा “ I WANT YOU TO finish your homework now” ह्या tone मध्ये authority आहे; अपेक्षित असलेल्या action बद्दल clarity आहे.

मी हा tone माझ्या 4 वर्षाच्या मुलाबाबतीत वापरायचे ठरवले. त्याला एक विचित्र सवय होती. मी माझं काही काम करायला गेले कीत्याला माझी urgent गरज लागायची. तो स्वत: कडे माझं लक्ष वेधायचा प्रयत्न करायचा. कधीकधी ह्या गोष्टीमुळे मी irritate व्हायचे.

एक दिवस मी त्याला “ can u plz wait” ऐवजी म्हटलं “ I WANT YOU TO BE PATIENT and wait till I finish my work”

It worked !!

ह्या एका बदलामुळे मी कुठल्याही प्रकारची चिडचिड न करता किंवा आवाज जराही न चढवता मला हवं ते साध्या करू शकले.

आता तुम्ही म्हणाल ह्या authority ची काय गरज? तर त्यावर John Rosemand ह्यांचेच उत्तर quote करेन “पालक हे मुलांचा सांभाळकरतात. सगळ्या जबाबदार्या पेलतात आणि म्हणून त्यांचे वर्चस्व स्वाभाविक आहे. मुलांना काहीही न करता जर आपण तोच दर्जा दिलातर मग त्यांना अगदी सहजपणे entitled वाटू लागेल. आणि अशा पाल्याला काही करण्याची गरज वाटणे कदापि शक्य नाही”

दुसरी गोष्ट - क्रमश:

PC - Google

 
 
 

Comments


bottom of page