top of page

मुलांशी बोलताना- भाग २

  • Writer: leena dhawan
    leena dhawan
  • Dec 28, 2020
  • 2 min read

मुलांनी आमचं ऐकावं म्हणून आम्ही अंगीकारलेली दुसरी गोष्ट - preparing fishing rope correctly


How to win friends and influence people ह्या self help book मध्ये लेखकाने मनुष्यस्वभावाबद्दल एक खूप interesting गोष्टसांगितली आहे. “मी” किंवा “ ह्यांत माझा फायदा काय” ही गोष्ट प्रत्येक माणसासाठी खूप महत्वाची असते. तेव्हा एखाद्या गोष्टीसाठीसंभाषण सुरू करताना किंवा वाटाघाटी करताना आपण त्या specific व्यक्तीला त्यातून काय RELEVANT असा फायदा होणार आहेहे अधोरेखित करणे महत्वाचे ठरते. मासे गळाला लागावेत म्हणून कोळी माशांना आवडेल असा पदार्थ गळाला लटकवतो, स्वत:च्याआवडीचा पदार्थ नाही हे ह्यामागचं logic आहे.


मुलांकडून कुठलेही काम करवून घेताना आपण त्यांना generic फायदे सांगतो, जसं की तू good boy/girl आहेस ना वगैरे वगैरे. पणत्याऐवजी आपण त्याच्या वयाला योग्य असं त्याच्या मतलबाचं आणि आपल्या दृष्टिकोनातूनही सोयीस्कर असं बोलंलं तर आपल्यालाजास्त चांगला response मिळू शकतो.

एक छोटंसं उदाहरण मी इथे share करते....

माझ्या मुलांमध्ये वयाचं अंतर कमी आहे आणि त्यामुळे खेळण्यांसाठी सतत भांडण होत असतात. म्हणूनच मी सतत त्यांना sharing शिकवण्याचा प्रयत्न करते.

सुरुवातीला sharing is caring वगैरे पुस्तकी ज्ञान देऊन झालं; good boy bad boy असे tags देऊन चुचकारून पाहिलं; मोठ्याला “ तूदादा आहेस ना “ वगैरे म्हणून मान देऊन झाला... पण ह्या असल्या गोष्टींचा त्यांच्यावर परिणाम होत नव्हता.

तेव्हा एकदा म्हटलं “ what according to you is better? one toy or two toys ? One cake or two cakes? “

मुलं म्हणाली “ two is better”

तेव्हा म्हटलं” जर तुम्ही share कराल तर तुम्हाला double toys आणि double खाऊ मिळेल. Else you will have to keep playing with same toys again again”

माणसाला स्वत:चा फायदा वयाच्या तिसर्या वर्षापासून कळतो हे मला त्यादिवशी कळलं 😉

इथे मी एक गोष्ट नमूद करू इच्छिते; मुलांच्या फायद्याची गोष्ट म्हणजे incentivisation नाही, जास्त खाऊ किंवा खेळणी आणूनदेण्याकडे माझा रोख नाही तर त्यांचा दृष्टिकोन समजून त्यांना भावनिक समाधान मिळवून देण्याचा उद्देश आहे.

मुंबई पुणे मुंबई ह्या चित्रपटातील एक संभाषण मला नेहमी आठवते. त्यात मुलगा स्वप्नील जोशी वडिलांना (प्रशांत दामलेंना) म्हणतोकी, “ तुम्ही मला मी जे मागितलं ते दिलंत. मी माझ्या मुलांना तसं देऊ शकेन का?”

त्यावर त्याचे वडिल त्याला म्हणतात, “ अहं, मी फक्त तुला तसं वाटू दिलं”

मुलांना हे भावनिक समाधान वाटू दिले तर ते आपलं निश्चितच ऐकतील

तिसरी गोष्ट - क्रमश:

 
 
 

Comments


bottom of page