लग्नाचं Right age
- leena dhawan
- Nov 4, 2020
- 2 min read
“ ए ताई, एक विचारू??” बाचकतच गार्गीने बाजूला बसलेल्या अनघाला प्रश्न केला.
“विचार ना... तसंही आज किती महिन्यांनी भेटतोय आपण. बर्याच दिवसांनी कोणाचं तरी लग्न attend करतेय मी.” - अनघा mocktail चा घोट घेत म्हणाली.
“लग्नाचं असं एकदम “ right age” काय असतं? - गार्गीने विचारून टाकलं आणि मुद्दयालाच हात घातला.
आता बिचकायची पाळी अनघाची होती. आत्ता कुठे MBA झालेल्या गार्गीने हा प्रश्न विचारावा हे तिला अनपेक्षित होतं.
अनघा हसली आणि म्हणाली “ जेव्हा तू एका परक्या व्यक्तीला आयुष्यात प्रवेश देण्यासाठी मनापासून तयार होशील ते. There is no definite number.”
“ तू बरेच मुलगे बघितलेस ना गं? ममा सांगत होती... rather मला घाबरवत होती” - गार्गीने हळूच पुढच्या मुद्दयाला हात घातला.
“ hmmm ... मी तर कांदेपोह्यांच्या अनुभवांवर पुस्तक लिहू शकते.” - अनघा ने खळखळून हसत उत्तर दिले आणि पुढे म्हणाली...” अनेक स्थळं बघून पाहून पसंत करण्यात मला काहीच गैर वाटत नाही. अगं साधा ड्रेस खरेदी करायचा म्हटलं तर कित्ती options बघतोआपण... हे तर एवढं मोठ्ठं decision आहे. मला थोडा वेळ लागला आणि तो गरजेचा होता. अगदी 24-25 व्या वर्षी लग्न केलं असतं नातर करिअरच्या सुरुवातीला खूप जास्त जबाबदार्या घेऊन बसले असते आणि कदाचित खूप immature पणे वागले असते.
“म्हणजे?”- गार्गीला बर्याच दिवसांनी तिच्या कलाने बोलणारं कोणीतरी गवसले होते.
“म्हणजे असं की, माझं लग्न “ so called” उशीरा झाल्यामुळे मला करिअरच्या सुरूवातीच्या वर्षात चांगला जम बसवता आला. त्यामुळे, आता office मध्ये मला flexibility आहे आणि experience मुळे संधी सुद्धा आहेत. तसंच मी माझ्या मैत्रिणींना आलेलेproblems बघितले आणि त्यातून शिकले. Nuclear family चा हट्ट धरणारी मी आता joint family मध्ये खूष आहे. मी माणसंओळखायला शिकले आणि त्यामुळे फक्त good looking, well educated, NRI ह्या वरवरच्या गोष्टींपेक्षा supportive, emotionally stable, positive attitude असणार्या सुस्वभावी व्यक्ति आणि कुटुंबाची निवड करण्याची परिपक्वता माझ्यात आली” - अनघा घडाघडा बोलत होती.
तेवढ्यात गार्गीने पुढचा प्रश्न विचारला, जो मनांत ठेवून ती कितीतरी वेळ चुळबुळत होती.
“Can I ask you something personal?” ती म्हणाली आणि अनघाने होकारार्थी मान डोलावताच तिने चटकन् विचारून टाकले- “तुला कधी boyfriend होता? आणि तू लग्नाआधी जीजूंना सांगितलं होतंस? “
“ खरं सांगू ? मलातर वाटतं प्रत्येकाने relationshipचा अनुभव घेतलाच पाहिजे. आपण त्यातून शिकतोच गं. हे असं..पहिलं प्रेम तेचशेवटचं वगैरे झूठ आहे. अगदी रोमिओ- ज्युलिएट ने पण लग्न केलं असतं ना तर त्यांना वाटलं असतं की अजून options बघायला हवेहोते.” त्यावर दोघीं एकमेकांना टाळ्या देऊन हसल्या.
“ त्यामुळे कोणी विचारलं तर सांग आणि प्रतिप्रश्न ही विचार. कुठल्याही नात्यात प्रामाणिकपणा हवा, पण समोरच्याची त्याप्रामाणिकपणाची किंमत करण्याची आणि तेवढचं प्रामाणिक राहायची कुवत हवी.
मुलाबद्दल तसंच घरच्यांबद्दल पूर्णपणे जाणून घे, वेळ घे, कुठच्याही pressure ला बळी पडू नकोस. संपूर्ण विचार करून decide कर.”
“Thanks ताई!! मैत्रिणींची लग्न जमायला लागली तशी ममा मला एकदम pressurise करायला लागली. माझी अजून मनाची तयारीनाही आहे पण मग भीती वाटते की मी मागे पडले तर!!” - गार्गीच्या मनाची चलबिचल तिच्या चेहर्यावर दिसत होती
“अस्संच व्हायचं माझं पण. पण आता वाटतं, दोन आयुष्य ही दोन time zones प्रमाणे असतात. Time zones मध्ये वेळेचा फरकअसला, म्हणून काही ते एक- दुसर्याच्या मागे किंवा पुढे नसतात. So chill and enjoy this phase. “ अनघाने गार्गीच्या पाठीवरथोपटलं.
गार्गीने तिला मिठीच मारली आणि म्हणाली- “ आजच्या उपदेशाबद्दल thanks पण पुन्हा अशा discussion ची गरज लागेल बरं का! “
“ Anytime! “ - अनघा हसत म्हणाली आणि दोघींनी buffet कडे मोर्चा वळवला.
Totally agree with you