top of page

हव्यासाकडून आस्वादाकडे - power of Vitamin N भाग २

  • Writer: leena dhawan
    leena dhawan
  • Jan 12, 2021
  • 2 min read

Assumption is mother of failures - हे माझ्या सगळ्यात पहिल्या boss चं आवडतं वाक्य होतं. इतकं आवडतं की त्यांच्या cabin मध्ये ते त्यांनी फ्रेम केलं होतं. त्यामुळे एखादं काम झालं नाही आणि चुकून जरी तोंडातून “ sir I thought ... “ म्हणून वाक्य निघालं कीत्यांचं पुढचं वाक्य ठरलेलं असायचं. “ don’t think or assume. Cross check and confirm”

पुढे हे वाक्य इतकं मनावर बिंबलं की I assumed म्हटलं की स्वत:च स्वत: ला टपली मारली जायची.


परवा मुलांना जेवायला वाढताना पुन्हा एकदा ह्या वाक्याची आठवण झाली. कोबीची भाजी केली होती तेव्हा मुलांसाठी दुसरी भाजीकरते अशा विचारात होते.

सासूबाई पट्कन म्हणाल्या, “ अगं द्यायच्या आधीच कशाला दुसरी भाजी? देऊन बघ. अशीच तर भाज्या खायची सवय लागते.”

म्हटलं ठीक आहे आणि वाढली भाजी.

मुलांनी काहीही कटकट न करता भाजी खाल्ली.


ही लहानशी घटना मला एका गोष्ट शिकवून गेली. जसं ही भाजी मुलं खाणार नाहीत हे माझं assumption होतं तसंच एखादी वस्तूघ्यायला मी नकार दिला तर मुलं ऐकणार नाहीत, त्यांना वाईट वाटेल, ती मला वाईट पालक समजतील किंवा त्यांना मागितलेली हरेकवस्तू देणं म्हणजे आपण आपलं कर्तव्य पूर्ण करत आहोत ह्या गोष्टीही assumptions असू शकतात.

कारण बर्याचदा नव्याची नवलाई चार दिवसही टिकत नाही. त्यात एखादी वस्तू मागायच्या आधीच किंवा मागितल्याबरोबर मिळाली कीमुलांना त्याचं औत्सुक्यही वाटत नाही.

मग असं जर असेल तर त्यांना upfront नाही म्हणायला मी का कचरावं?

तसंच जेव्हा scarcity असते ना तेव्हाच माणूस creatively काम करतो.... obvious नसणारे मार्ग शोधतो हे मी माझ्या marketing च्याअनुभवावरून अगदी खात्रीपूर्वक सांगू शकते.

असा सगळा विचार जुळून आला आणि ठरवलं आता ऊठसूट बरहुकूम वस्तू आणायच्या नाहीत.

आणि खरं सांगू काहीही बिघडले नाही. मुलं कपाटात घुसली आणि त्यांनी त्याची जुनी खेळणी खेळायला काढली. ते दोघे नव्यानेत्यांच्याशी खेळू लागले. त्यांनी स्वत:चेच विविध खेळ बनवले आणि त्यांना त्यांच्या हुशारीचं आत्यंतिक कौतुक होतं.


मला खात्री आहे की ह्या बदलामुळे मी त्यांना जास्त creative, patient आणि समाधानी बनवू शकेन. आणि जेव्हा पालक म्हणून मीमाझ्या निर्णयांबद्दल sure असते तेव्हा guilty वाटण्याचा प्रश्नच नाही.


तुम्हाला हा लेख आवडला तर like आणि share करा. तुमचा feedback comments द्वारे कळवा.

 
 
 

Comments


bottom of page